
गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघातील आघाडीचा फलंदाज सुरेश रैना याचे नाव अनेक अभिनेत्री सोबत जोडले जात आहे. एवढेच नव्हे तर तो लवकरच त्यांच्याशी विवाह करणार असल्याच्या अफवाही पसरविल्या जात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघातील आघाडीचा फलंदाज सुरेश रैना याचे नाव अनेक अभिनेत्री सोबत जोडले जात आहे. एवढेच नव्हे तर तो लवकरच त्यांच्याशी विवाह करणार असल्याच्या अफवाही पसरविल्या जात आहेत.
काही दिवसांपूर्वीच तो अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत डेटिंग करीत असल्याच्या वावड्याही प्रसार माध्यमांनी पसरविल्या होत्या. या सर्व प्रकारामुळे सुरेश रैना जाम वैतागला असून, त्यांनी चित्रपट अभिनेत्रीसोबत विवाह करणार नसल्याचे म्हटले आहे मी लग्न करणार आहे. पण त्याच्यासाठी अजून दोन वर्षांचा अवधी आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबीयातून पुढे आलो आहे, याची जाणीव मला आहे. त्यामुळे कुठल्याच अभिनेत्रीसोबत विवाह करण्याचा माझा विचार नाही.
आयपीएल स्पर्धेतील फॉर्मबाबत विचारले असता त्यांनी यावेळेसची आयपीएल स्पर्धा जिंकून मला हॅटट्रिक साधायची आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचे विजेतेपद पटकाविले आहे. यावेळेस सुरुवातीच्या काही सामन्यात जरी दर्जेदार खेळ झाला नाही. येत्या काही सामन्यात आमचा खेळ सुधारेल असे वाटते. आमच्याकडे असलेल्या अष्टपैलू खेळाडूच्या जोरावर हॅटट्रिक साधण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चेन्नई सुपर किंग्जचे सामने होम ग्राऊंडवर होत असताना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. नव्या दमाचे खेळाडू असलेले मुरली विजय, अनिरुद्ध, श्रीकांत यांची कामगिरी चांगली होत आहे. त्यांना आर. आश्विन व बद्रीनाथ यांची साथ लाभत असल्याने आम्ही यावेळेस विजयाची हॅटट्रिक साधणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.