हर्ली डेव्हीडसन बाईक- जॉनची अक्षयकुमारला भेट

स्वप्ननगरी बॉलिवूडमध्ये खरोखर कांहीही घडू शकते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अक्षयकुमार आणि जॉन अब्राहमची मैत्री.विशेष म्हणजे जॉनप्रमाणेच अक्षयलाही हाय एंड बाईकची प्रचंड क्रेझ आहे हे आत्तापर्यंतचे गुपित जॉनला अचानक कळले. जॉन व अक्षयची भूमिका असलेले एकापाठोपाठ एक असे दोन सुपरहिट चर्चेत असतानाच त्यांच्याच हाऊसफुल्ल टूनेही असेच चमकदार यश मिळविले आहे. कांही काळ सतत एकत्र भूमिका केल्याने जॉन आणि अक्षयमध्ये मैत्रीचे बंध निर्माण झाले आहेत.
  हाऊसफुल्ल टू ने १०० कोटींचा व्यवसाय करून सुपरहिट बनण्याचा मान मिळविल्याने आनंदात असलेल्या जॉनने अक्षयला हाय एंड बाईक ‘ब्लॅक हर्ली डेव्हीडसन’ भेट म्हणून दिली आहे. देसी बॉईज टूच्या सेटवर काम करतानाच अक्षयची बाईकबाबतची आवड जॉनच्या लक्षात आली होती. मग आता चित्रपट सुपरहिट ठरल्यावर अक्षयला बाईक खेरीज आणखी चांगले प्रेझेंट कोणते देणार असा विचार करून जॉनने हर्लीची निवड केली आहे. मंगळवारी ही बाईक अक्षयला मिळेल मात्र अक्षयला या बाईकसाठी विशिष्ठ नंबरप्लेट हवी आहे त्यामुळे कदाचित त्याला बाईकवर स्वार होण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल असेही समजते.

Leave a Comment