सुशांत सिंग आता चित्रपटात झळकणार

छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून कित्येक दिवस प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारा सुशांत सिंग राजपूतला चित्रपटाची ऑफर आली आहे. त्यामुळे लवकरच तो मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
    गेल्या काही दिवसांपासून सुशांत हा गुजरातमध्ये सुरू असलेल्या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. सध्या चेतनच्या गाजलेल्या ‘थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ या कादंबरीवर आधारित ‘कार्द पुछे’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिषेक कपूर सांभाळीत आहे. या चित्रपटात सुशांतसह राजकुमार यादव, अमित साध हे नवीन चेहरेही झळकणार आहेत. या तिघांची निवड १५० अभिनेत्यांच्या ऑडीशनमधून करण्यात आली आहे. या चित्रपटाची ऑफर आल्यामुळेच सुशांतने ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका सोडली होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील मानवची केलेली भूमिका सर्वांना आवडली होती. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी देखील चांगलाच वाढला होता. सुशांत सिंग हा मेहनती कलाकार असल्याने तो आगामी काळात छोट्या पडद्याप्रमाणे रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकेल, अशी आशा करायला हरकत नाही.

Leave a Comment