करिश्मा कपूरची श्रद्धा की अंधश्रद्धा ?

सहा वर्षांच्या गॅपनंतर डेंजरस इश्क या सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत असलेली कपूरांची करिश्मा भारीच श्रद्दाळू आहे. इतक्या मोठ्या गॅपनंतर येत असलेला आपला चित्रपट चांगला चालावा यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहेच. पण बांद्रा सी फ्रंट कलब हा तिच्यासाठी अतिशय लकी असल्याचा तिचा विश्वास आहे. त्यामुळे या सिनेमासंबंधीची सर्व बोलणी, चर्चा तिने याच कलबमध्ये केल्या आहेत. विशेष म्हणजे या क्लबच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने तेथे खायला, प्यायला अशा कांहीही सोयी नव्हत्या तरीही तासनतास करिश्माने येथे केवळ पाणी पिऊन काढल्याचे दिग्दर्शक विक्रम भट  सांगतो. तो म्हणतो की दुरूस्तीमुळे या क्लबमध्ये इतकी अव्यवस्था होती तरीही आसपासची परिस्थिती विसरून करिश्मा नेमाने या कलबला भेट देत होती.
   या सिनेमाचे शुटींगसुरू होताना ही पक्षपंधरवडा सुरू होत होता म्हणून करिश्माने शुटिंग अगोदर सुरू करायला लावले. सप्टेंबरमध्ये हे शुटिंग सुरू झाले असले तरी पक्षपंधरवडा शुभ कामांसाठी चांगला नाही म्हणून हा पंधरवडा सुरू होण्याअगोदरच मुहूर्त करण्यात आला असेही विक्रम सांगतो.

Leave a Comment