बँक ऑफ इंडियाचे कर्ज स्वस्त

मुंबई, दि.७ – सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जाच्या दरात ०.७५ टक्क्यांची कपात केली आहे. तसेच बँकेने आपला आधार दरही ०.२५ टक्क्यांनी घटविला आहे. १ मे पासून नवीन व्याजदर लागू झाल्याचे बँकेने म्हटले आहे. नवीन व्याजदरानुसार ३० लाखांपर्यंतच्या कर्जावर १०.५० टक्के, ३० लाख ते ७५ लाखांपर्यंतच्या कर्जावर ११.२५ टक्के व्याज आकारण्यात येणार आहे.