फेरारी की सवारीत सचिनचा अॅक्टींग डेब्यू?

 सचिन तेंडुलकरच्या पंख्यांसाठी ( म्हणजे आपले फॅन्स हो !) एक अगदी आनंदाची खबर आहे. फेरारी की सवारी या हिंदी चित्रपटात सचिन कदाचित पडद्यावर झळकणार आहे. सचिन या चित्रपटात खरोखरच झळकेल का या विषयावरील तर्कवितर्कांना अगदी उधाण आले असतानाच या चित्रपटाचा हिरो शर्मन जोशीनेच सचिनच्या नावाचा उल्लेख चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असल्याचे सांगितले आहे.
शर्मन जोशी बरोबरच बोमण इराणीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका करत असून आपली विद्या बालन यात चक्क आयटेम साँग करणार आहे म्हणे! राजेश मापुसरकरांची कथा असलेल्या या चित्रपटात प्रेम, कुटुंब हाच प्रमुख विषय असून तो सर्वसामान्यांना आपलाच वाटेल अशा पद्धतीने चित्रित करण्यात आला आहे. गर्दीचे रस्ते, मॉबमधील लोकही रस्त्यावरचे सर्वसामान्य नागरिकच आहेत.
     एक लहान मुलगा, वडील आणि आजोबा याच्या संबंधाभोवती फिरणारी ही कथा कुणालाही भावेल अशीच आहे. फेरारीच्या कथेने या गोष्टीला अनपेक्षित ट्विस्ट मिळतो. मग तुम्हाला वाटेल यात सचिन कुठे आला?  तो आहे ना! कारण शर्मनला सचिनची फेरारी चोरायच्या सूचना मिळतात आणि कथाच फिरते. आधी संजय दत्तच्या फेरारीचा उल्लेख सिनेमात केला होता पण त्याऐजवी सचिनने नांव आले आणि सचिननेही मोठ्या दिलदारपणे आपले नांव वापरायची परवानगी दिली. त्यामुळे निर्माता विधू विनोद चोप्रा खूष आहे. सचिनने या सिनेमात छोटी एन्ट्री करावी अशीही विनंती सचिनला केली गेली असून त्यालाही सचिनने होकार दिला असल्याचे समजते. मात्र हे शूटिंग आयपीएलची गडबड संपल्यानंतर होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Leave a Comment