पूनम पांडेला नक्की हवंय काय?

 क्रिकेटच्या वर्ल्ड कपमध्ये भारत जिंकला तर मुंबईच्या रस्त्यातून विवस्त्र धावण्याची तयारी दाखवून प्रसिद्धी मिळविलेल्या पूनम पांडे या मॉडेल गर्लने आता तिचे बॉलिवूडमध्ये आगमन होत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र तिचे हे वक्तव्य म्हणजे लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे.
  भट्ट कुटुंबाच्या जिस्म दोन या चित्रपटात आपल्याला भूमिका मिळाली असल्याचे पूनम सांगते आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित सक्सेना करणार असल्याचेही तिने जाहीर केले आहे. मात्र अमितने यावर लगेच खुलासा करताना पूनमला जिस्म दोन साठी करारबद्ध करण्यात आलेले नसल्याचा खुलासा केला आहे.  या चित्रपटाबाबत केवळ प्राथमिक बोलणी झाली असल्याचे आणि टीमसोबत एक दोन बैठका झाल्याचे अमित सांगतो आहे तर भट्ट कुटुंबियांशी वादावादी झाल्याने अमितकडे जिस्म दोनची धुरा सोपविली जाणार नाही असे बोलले जात आहे. यावरही अमितने महेश भट्ट माझे आदर्श आहेत आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत असा खुलासा केला आहे.
   प्रश्न असा आहे की नक्की खोटे कोण बोलतेय ? अमित सक्सेना का पूनम?

Leave a Comment