
राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल माजी बॉलिवूड दिवा रेखाने कडक आनंद व्यक्त केला आहे मात्र जया बच्चन यांच्यासाठी ही फार आनंदाची बाब नाही असे दिसून येत आहे. त्यामागचे दुखणे आहे ते म्हणजे अमिताभ बच्चन. ७० च्या दशकातील या अँग्री यंग मॅनने जया भादुरीशी विवाह केला खरा पण त्यानंतर तो रेखाच्या जाळ्यात अडकला होता. परिणामी जया आणि रेखा यांच्यात सवतीसुभा सुरू झाला होता तो आजही कायम आहे असे सांगितले जाते. जया आणि रेखा यश चोप्रांच्या सिलसिला मधून आमोरासमोर आल्या होत्या पण त्यानंतर त्या दोघींनीही पुन्हा एकत्र काम केले नव्हते. बर्याच काळानंतर आता त्या पुन्हा राज्यसभेच्या सदस्य म्हणून आमनेसामने येत आहेत. राज्यसभेत रेखा यांना बसण्यासाठी ९१ नंबरची खुर्ची दिली गेली आहे तर जया बच्चन यांना ९८ नंबरची खुर्ची आहे.
खरेखोटे कोण जाणे पण जयाने आपली खुर्ची बदलली जावी अशी विनंती राज्यसभा अध्यक्षांकडे केली असल्याचे समजते. समाजवादीचेच राज्यसभा सदस्य ब्रिजभूषण यांचे निधन झाले असून त्यांची ९२ नंबरची खुर्ची आपल्याला मिळावी अशी विनंती जयाने केली आहे म्हणे! हे कशासाठी? आपल्या मनात रेखाबद्दल कांही नाही हे दाखविण्यासाठी की रेखावर लक्ष ठेवण्यासाठी ?
