चेन्नई एक्स्प्रेस कतरिनाची की दीपिकाची?

रोहित शेट्टी याच्या आगामी चेन्नई एक्स्प्रेसमध्ये शाहरूख सोबत नायिका म्हणून कतरिना चढणार की दीपिका पदुकोण या विषयीच्या चर्चेला सध्या बॉलिवूडमध्ये उत आला आहे. ऑगस्टमध्ये रोहित त्याच्या या नव्या चित्रपटाचे काम सुरू करतो आहे मात्र कतरिना की दीपिका हा घोळ मात्र अद्यापी संपलेला नाही. कांही जण कतरिनाची निवड झाली असल्याचे खात्रीलायक रित्या सांगत आहेत तर कांही जण दीपिकाची निवड झाल्याची खात्री देत आहेत. कतरिनाची निवड नक्की असून पेपरवर्क अजून झालेले नाही असे सांगितले जात असताना कतरिनाचे फ्रेंडस कतरिनाने विजय कृष्ण आचार्य यांच्या पुढच्या चित्रपटासाठी डेटस दिलेल्या असल्याने तिच्याकडे डेटस नाहीत असे सांगत आहेत. तर अन्य एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपिकाची निवड झालेली असून दीपिकाकडून डेटस मिळाल्यानंतर पेपरवर्क पूर्ण करण्यात येणार असल्याचे व त्यानंतरच दीपिकाच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सांगत आहेत.
  दीपिका असो वा कतरिना, शाहरूखला आणि आपल्याला काय दोघीही चालणार, होय नां!

Leave a Comment