
पुणे दि.२७- राष्ट्रपती प्रतिभापाटील याना निवृत्ती नंतरच्या निवासासाठी संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेली खडकीयेथील दोन लक्ष बेचाळीस हजार चौरस फूट जागा त्यांनी परत केल्याने पुण्यातील निवृत्त सेनाधिकारी मंडळींनी आनंद व्यक्त केला आहे. निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी माहितीच्या आधिकारात ही माहिती मिळवली होती व सामान्य सैनिकाला निवासाला प्रत्येक ठिकाणी जागेची अडचण येत असताना राष्ट्रपतींना मात्र येवढी जागा दिली जाते याबाबत त्यांनी गेले वर्षभर आंदलन सुरु ठेवले होते.
