
मेक्सिको दि.२७- सहा मुली आणि तीन मुलगे असा एकाचवेळी नऊ जणांना जन्म देण्याचा विक्रम मेक्सिकोतील कार्ला व्हेनेस्सा ही महिला करणार असून २० मे रोजी तिची डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. सध्या ती हॉस्पिटलमध्येच दाखल असून तिने मुले व्हावीत यासाठी फर्टिलिटी उपचार घेतले होते. त्यामुळेच हा चमत्कार घडणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कार्ला थोडी टेन्शनमध्ये असली तरी नर्व्हस झालेली नाही. आपल्या मुलांची नांवे अजून निश्चित केलेली नाहीत असे सांगतानाच आधी सर्व सुरळीत पार पडू दे असेही ती म्हणाली. ही नऊ मुले सुखरूप जन्माला आली तर ते जगातील रेकॉर्ड ठरणार असून यापूर्वी कॅलिफोर्नियातील एका महिलने एकावेळी आठ मुलांना जन्म देऊन प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते.
