मल्लिका शेरावत अडचणीत

बॉलिवूडमधील चित्रपटांना आयटेम साँग ची चटकच लागली आहे. केवळ मलायका आणि मल्लिका पुरती आता ही आयटम साँग मर्यादित राहिली नसून अनेक बड्या अभिनेत्रीही आयटेम साँगसाठी लटके झटके दाखवित आहेत. अनेक अभिनेत्रींसाठी ही आयटेम साँग वरदानही ठरली आहेत मात्र आयटेम साँगसाठीच प्रसिद्ध असलेल्या मल्लिकाला मात्र हा फायदा मिळताना दिसत नाही.
   दिग्दर्शक प्रियदर्शनच्या थ्रिलर “तेज” या चित्रपटातही मल्लिकाचे आयटम साँग होते मात्र त्याचा फारसा फायदा चित्रपटाला होत नाही असे कारण देऊन ते फायनल प्रिंटमधून काढूनच टाकले गेले आहे. मल्लिकाच्या अति नखर्‍यामुळे ते चित्रपटातून काढले गेले अशी आतली बातमी आहे. पण हे आयटम नंबर वगळले गेल्याचे पाहून “मुंबई मिरर” या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मल्लिकाला त्यांच्या चित्रपटातूनही डच्चू दिला असल्याची खबर आहे. मिररचा निर्माता सांगतो, तेजमधील लैलाच्या आयटमचा कांहीच प्रभाव गाणे पाहताना जाणवला नाही. त्यात मल्लिकाची जादू कुठे दिसलीच नाही. या गाण्यात मल्लिकाने कांही विशेष केल्याचेही जाणवत नाही. त्यामुळे केवळ मल्लिकाच्या नावावर चित्रपट चालेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचेच असल्याने आम्ही तिला चित्रपटातून काढून टाकले आहे.
  तेजचे निर्माते रतन जैन यांना सुरवातीला मल्लिकाचे आयटम चित्रपटात ठेवायचे होते मात्र दिग्दर्शक प्रियदर्शन हे गाणे वगळावे यावर ठाम होता. अखेर जैन यांनी या गाण्याच्या प्रमोशनवर पैसा वाया घालविण्याऐवजी तो सिनेमाचे प्रोमो व अॅक्शनवर खर्च करायचा निर्णय घेतला असे समजते.

Leave a Comment