बेकहॅमच्या कन्येला मॉडेलिंगची ऑफर

लंडन दि.२८- जगातील फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातला ताईत आणि प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्डिड बेकहॅम याच्या कन्येला एका कंपनीने आपली ब्रँड अॅम्बेसिडर बनण्याची ऑफर दिली आहे. बेकहॅम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरिया यांची मुलगी हार्पर ही अवघी नऊ महिन्यांची आहे. लहान मुलांसाठी कपडे बनविणार्‍या कंपनीने तिला ही ऑफर दिली असल्याचे समजते.
   या कंपनीने हार्परला तसे पत्रच पाठविले आहे. पत्रात कंपनी म्हणते की अगदी लहान वयातच फॅशन इंडस्ट्रीत उतरण्याची संधी आम्ही तुला देऊ इच्छीतो. फॅशन क्षेत्रात तुझे आईवडील टॉपवर आहेतच. तू सुद्धा या क्षेत्रात आत्ताच आपले करिअर सुरू करू शकतेस. आमच्या नवीन उत्पादनांची जाहिरात तू करावीस अशी आमची इच्छा असून त्यासाठी योग्य तो मोबदला आम्ही देऊच. मात्र तू अजून खूपच लहान असल्याने मोबदल्यासंबंधीची चर्चा आम्ही तुझ्या आईवडिलांबरोबर करू.
  माय फर्स्ट इअर डॉटकॉम या संकतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.