लाव्हाचा स्मार्टफोन बाजारात

मुंबई, दि. २० – मोबाईल उत्पादक कंपनी लाव्हाने ‘झोलो एक्स ९००’ हा नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. यासाठी कंपनीने कॉम्प्युटर चीपची निर्मिती करणार्‍या इंटेल कंपनीशी भागीदारी केली आहे. या स्मार्टफोनला इंटेलच्या `अटॉम झेड २४६०’ या वेगवान प्रोसेसरचा समावेश करण्यात आला असून, याची किंमत २२ हजार रूपये आहे. यात ४.०३ इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे. ८ मेगापिक्सल कॅमेरा आहे. अँड्रॉइड ४.० ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

Leave a Comment