
यवतमाळ, दि. १९ – सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालविण्यात आलेल्या अनुदानित वसतिगृहातील कर्मचार्यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी, येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यापैकी आठ कर्मचार्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मंगळवारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या जिल्ह्यातच आपले प्राण सोडू मात्र, माघार घेणार नाही,’ असा पवित्रा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचे राजाध्यक्ष्य बी. डी. जायभाय यांनी घेतल्याचे सांगितले. उपोषणाला बसलेल्यांपैकी सूर्यकांत कोद्रे, राधाबाई सोनसळे, अशोक जाधव, रामदास कोळपे, बिसन काळे, कल्पना भारतूरकर, सुंदरदास कांबळे, चंद्रप्रकाश चव्हाण या कर्मचार्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
