करिना लवकरच ‘रामलीला’ चित्रपटात

मुंबई, दि. १६ – बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री बेबो म्हणजेच करिना कपूर सध्या यशाच्या शिखरावर असताना मधूर भांडारकरच्या `हिरोईन’  चित्रपटाचे काम लवकरात लवकर संपविण्याच्या ती प्रयत्नात आहे. इतकी घाई तिला नेमकी कोणत्या गोष्टीची आहे ? असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. त्याचे उत्तर करिना आणि सैफचे लग्न नव्हे तर संजय लीला भन्साली यांचा आगामी चित्रपटच आहे.
    भंसाली यांच्या आगामी ‘रामलीला’ या चित्रपटात करीनाची मुख्य भूमिका आहे. त्यामुळेच तिला भांडारकर यांच्या ‘हिरोईन’ चित्रपटाचे काम लवकरात लवकर संपवून ‘रामलीला’ चित्रपटाची तयारी करायची आहे. आपली प्रत्येक भूमिका परफेक्ट असावी असाच तिचा अट्टहास असतो. एकावेळी दोन चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करणे करिनाला थोडे कठीणच असल्यामुळे हिरोइनचे काम लवकर पूर्ण करून करिना आपले संपूर्ण लक्ष्य ‘रामलीला’वर केंद्रीत करणार आहे.
    ‘हिरोईन’ आणि ‘रामलीला’ या दोन्ही चित्रपटांमधील भूमिका आव्हानात्मक आणि महत्वपूर्ण असल्याचे करिना सांगते. ‘रामलीला’मधील भूमिका अत्यंत गंभीरपणे साकारणार असलेली करिना ‘हिरोईन’मधील भूमिकेलासुद्धा तितकेच महत्व देते. सर्वात महत्वाचे म्हणजे इतक्या व्यस्त वेळापत्रकातून करिना सैफसोबत लग्नासाठी कधी वेळ काढते यावर तिच्या चाह्त्यांचे लक्ष आहे.

 
    
  

 

   
 
    
  

Leave a Comment