नागपुरात महात्मे फुले संशोधन केंद्र

नागपूर,  दि. १५ –  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात महात्मा फुले संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी केली.
महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमीतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार पूर्णचंद्र बुटी सभागृहात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. विलास मुत्तेमवार, आ. नागो गाणार, सामाजिक कार्यकर्ते सुनील सरदार, माजी आमदार अशोक मानकर, चंद्रभान भोईर उपस्थित होते.