आईच्या पसंतीनेच लग्न करणार कतरीना

मुंबई,दि.२२फेब्रुवारी-बॉलिवूडची बार्बी डॉल कतरीना कैफच्या अभिनयाचा आलेख एकीकडे उंचावत असतानाच दुसरीकडे खाजगी जीवनाच्या आलेखात चढउतार होत आहे. प्रथम तिचे प्रेमसंबंध सलमान खानसोबत असल्याची चर्चा फिल्मी दुनियेत होती. परंतु त्यांच्या ब्रेकअपनंतर तिचे नाव रणबीर कपूरसोबत जोडले जात होते. या सर्व गोष्टींवरून कतरीना खूपच दुःखी झाली आहे.
मात्र आता प्रेमप्रकरणापासून दूर राहत तिने आपल्या जिवनातील सर्वात महात्वाचा निर्णय तिच्या आईवर सोडला असल्याचे समजते आहे. तिने आपल्या आईजवळ अॅरेंज मॅरेज करणार असल्याची इच्छा नुकतीच व्यक्त केली आहे. तसेच प्रेमात खूप वेळा दुःख सोसलेल्या कतरीनाने आता कोणत्याही फिल्म इंडस्ट*ीतील व्यक्तीसोबत जास्त जवळीक न वाढवण्याचा व आपल्या को-स्टार्ससोबत देखील जास्त भावनात्मक लगाव न ठेवण्याचा निर्णयदेखील घेतला आहे.

Leave a Comment