इंदू मिलच्या भूमीपूजनाला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आंबेडकर जनतेला आवाहन

मुंबई, दि. ६ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारने इंदू मिलची जागा देण्याचे मान्य केले असून या स्मारकासाठी भूमीपूजन समारंभ शनिवार, १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. तरी या ऐतिहासिक कार्यक्रमाला आंबेडकर जनतेचे लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आनंद आंबेडकर यांनी केले आहे.
भूमीपूजनच्या निमित्ताने या स्मारकाविषयी आंबेडकरी जनता किती सजग आहे, हेही राज्य सरकारला दाखवून देता येईल असेही आनंद आंबेडकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या भूमीपूजनाची पूर्वतयारी करण्यासाठी सर्व जयंती उत्सव मंडळ, बौध्द महासभा, बौध्दजन पंचायत समिती तसेच तमाम आंबेडकरी संस्था व संघटनांचे कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक मंगळवार, १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आंबेडकर भवन, दादर (प) येथे आयोजित केली आहे.

Leave a Comment