पोलीसांनी गाडी चोरली नाही, पुणे पोलिसांचा खुलासा

पुणे,  दि. ४ – पुणे पोलिसांनी तन्मयपुरी सोसायटीतून दुचाकी चोरली नसून चोरलेली दुचाकी ताब्यात घेण्यासाठी पोलीस तेथे हजर होते, असा खुलासा पुणे पोलिसांनी बुधवारी केला.

   सोमवारी पहाटे कोथरूड येथील तन्मयपुरी सोसायटीतून चोरट्याला सोबत घेऊन पोलिसांनी दुचाकी उचलल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. ही बातमी आणि फुटेज टीव्हीवर झळकल्यानंतर पुणे पोलिसांवर म्हटले आहे की, सोमवारी पहाटे गस्तीवरील पथकाने आरोपी विठ्ठल रामलू राठोड या वाहनचोराला अटक केली. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आणखी दुचाकी चोरल्या असून त्या तन्मयपुरी सोसायटीत असल्याचे सांगितले. त्यानुसार ती गाडी ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक तेथे गेले आणि त्या गाड्या हस्तगत केल्या. या गाड्यांचा पंचनामा करण्यात आला आहे. गाडीच्या कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर नमूद गाडी वाशीम येथील असल्याचे आढळले. फिर्यादी अविनाश देशमुख हे याच सोसायटीत राहत असल्याची माहिती नसल्याने गाडी ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.