ड्रोन हल्ल्याचे वाईट परिणाम – झरदारी

नवी दिल्ली,  दि. ५ – पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांनी अमेरीकेच्या ड्रोन हल्ल्यांना चुकीचे सांगत त्यांचे वाईट परिणाम दिसून येत असल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यांमध्ये होणार्‍या निर्दोष नागरिकांच्या हत्येमुळे नागरिकांमध्ये वाढता रागामुळे दहशतवाद वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. झरदारी सध्या पंजाब प्रांताच्या दौर्‍यावर आहेत.

      झरदारी यांनी दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या थॉमस निदेस यांची बुधवारी लाहोर येथील गव्हर्नर हाऊसमध्ये भेट घेतली होती. त्यावेळी झरदार यांनी पाकिस्तान आणि अमेरिकेतील संबंध आपापसातील सन्मान आणि हीत यावर  दीर्घकाळासाठी टीकण्याच्या दृष्टीने आधारित असायला हवे, असे सांगितले. यापूर्वी निदेस यांनी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी पाकिस्तानच्या सार्वभौमतेच्या स्न्मानाविषयी चर्चा केली होती.