शेखर सुमनचा ‘मुवर्स अॅंड शेकर्स’ पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर

छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘मुवर्स अॅंड शेकर्स’ आता परत येत आहे. या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता शेखर सुमन याही पर्वात या शोचं सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात ज्येष्ठ समाजसेवी अण्णा हजारेंना आमंत्रित करण्याची शेखरची इच्छा आहे. यासंदर्भात अण्णाशी बोलणं झालं असून त्यांच्याकडून होकार असल्याचं बोललं जात आहे.

अण्णा हजारेंचं लोकपाल आंदोलन देशभर गाजलं होतं. शेखरने सांगितलं की, माझ्या मते अण्णां सामान्य माणसाचा आवाज आहे.यामुळेच माझ्या शोची सुरवात त्यांच्या मुलाखतीने व्हावी अशी माझी इच्छा आहे. १९९७ मध्ये सोनी वाहिनीवर पहिल्यांदा हा शो सुरु झाला होता. हा कार्यक्रम त्यावेळी खूप गाजला होता. आता एका मोठ्या कालावधीनंतर  मार्चपासून सब टीव्ही हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

Leave a Comment