पवारांचा ‘वार’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसला पुरते घायाळ करायचे असा निर्धारच केला आहे. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात काही जिल्हा परिषदांचे पदाधिकारी निवडताना भाजपा आणि शिवसेनेचे अप्रत्यक्ष सहकार्य घेऊन काही ठिकाणच्या निवडणुका ‘गमावल्या’ आहेत. त्यावर पवारांनी काँग्रेसवर आघाडीचा धर्म मोडल्याचा आरोप केला आणि चक्क सहा ठिकाणी काँग्रेसला टांग मारीत आपले उमेदवार निवडून आणले. काँग्रेसने आघाडीचा धर्म मोडून अयशस्वी प्रयोग केला तर पवारांना यशस्वी प्रयोग केला. त्यावर पवार पहिल्यांदा काँग्रेसनेच आघाडीचा धर्म मोडला असा प्रतिटोला मारत आहेत आणि काँग्रेसच्या नेत्यांना हैराण करीत आहेत. 

काँग्रेससाठी हा तड बांधून बुक्क्यांचा मार आहे कारण मार तर बसत आहे पण माराचा प्रतिकार करून आघाडीही मोडता येत नाही. मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांना रिपोर्ट देत आहेत. सोनिया गांधी रिपोर्ट घेत आहेत. रिपोर्टवरून आपल्याला राष्ट*वादी काँग्रेसशी केलेली युती परवडणारी नाही हे त्यांना पटत आहे पण  म्हणून युती मोडावी तर आता आहे तीही सत्ता गमवावी लागते हेही त्यांना कळत आहे आणि मनाची तळमळ होत आहे.    

महाराष्ट्रातल्या राजकीय युत्या आणि आघाड्या यांचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की, पवारांशी युती करणारा पक्ष झिजून झिजून मरत असतो. १९८० ते ८६ या काळात पवारांनी जनता दलाशी मैत्री केली होती. तो पक्ष महाराष्ट्रातून संपला. आता त्याचा एखादाही आमदार निवडून येणे मुष्कील झाले आहे.तसाच अनुभव काँग्रेसलाही येत आहे. या दोन पक्षांची युती होऊन बरीच वर्षे झाली पण अजून तरी काँग्रेस पक्ष पवारांशी युती करून संपलाय असे काही दिसत नव्हते.

पवारांशी युती करण्याबाबत जे काही सांगितले जात होत ते निदान आपल्याबाबत तरी खोटे ठरले आहे असे समाधान काँग्रेसचे नेते मानत होते पण पवारांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसला बरबाद करण्याची कारस्थाने  परिणाम कारकपणे केली. काँग्रेसच्या नेत्यांना पवारांच्या कर्तृत्वाचा अनुभव यायला लागला. आगामी  विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवून पवारांनी अनेक ठिकाणी काँग्रेसला संपवण्याचा डाव टाकला. तत्त्वांचा काही प्रश्नच नव्हता. काँग्रेसला संपवणे आणि आपल्यासाठी स्थान निर्माण करणे हेच त्यांचे तत्त्व आहे. त्यानुसार त्यांनी काही जिल्हा परिषदांत स्थान मिळवले आहे. एवढे  करून ते काँग्रेसलाच आघाडी धर्म शिकवीत आहेत.

पवारांनी सहा ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची मदत घेऊन काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला आहे आणि आता तेच काँग्रेसला, आपला समान आणि क्रमांक एकचा शत्रू जातीयवादी शक्ती  आहेत हे विसरू नका असे म्हणून काँगसलाच त्याच्या सेक्युलॅरिझमची आठवण करून देत आहेत. पवारांसारखा ग्रेट नेता कोणी नाही. महाराष्ट*ात या सगळ्या कारवाया सुरू आहेत. त्या करूनही आपलाच आवाज मोठा असावा अशी स्थिती  त्यांना दिल्लीत मिळाली आहे. पंतप्रधान मनमोहन सिग यांनी एका भाषणात केलेल्या एका विधानाने ती निर्माण झाली आहे. डॉ. सिग यांचे ते विधान, आपल्या  ग्रामीण भाषेत सांगायचे तर, खाजून खरूज काढणारे होते.

आपल्या कारभारात धाडसी निर्णय घेण्याआड आपल्या घटक मित्र पक्षांची मोठी अडचण येते असे त्यांनी प्रतिपादन केले. हे म्हणताना त्यांचा रोख तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक यांच्याकडे होता. त्यांना पवारांवर किवा राष्ट*वादी काँग्रेसवर काही आरोप करायचा नसावा पण पवारांनी ही संधी साधली. पंतप्रधानांच्या या वक्तव्याने आपण व्यथित झालो आहोत असे म्हणून त्यांनी आपली नाराजी जाहीरपणाने व्यक्त केली. त्यामुळे काँग्रेस नेते  बचावाच्या पवित्र्यात गेले आणि याच अवस्थेत पवारांनी आक्रमण करून महाराष्ट*ात काँग्रेसचे खच्चीकरण केले.

काँग्रेसच्या नेत्यांना महाराष्ट*ात आणि दिल्ली तही फार काही करता येत नाही कारण ते पवारांना दूर करू शकत नाहीत. तसा दिल्लीत काही पवारांचा पाठींबा निर्णायक नाही. पण मुंबईत तो निर्णायक आहे आणि या दोन पक्षांनी आपली युती मोडली तर काँग्रेसला महाराष्ट*ातली सत्ता गमवावी लागेल. आधीच तर एकेका राज्यातला जनाधार मोडून पडायला लागला आहे. आंध्राने २००९ साली काँग्रेसचे ३६ खासदार निवडून दिले होते. आता हे राज्य हातातून निसटून चालले आहे. बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या तीन राज्यात नगण्य  स्थान आहे.

ममता बॅनजीं यांनी संपुआघाडीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला तर प. बंगालातही काही स्थान उरणार नाही. अशा रितीते क्रमाने चार मोठ्या राज्यात काँग्रेसचे स्थान डळमळीत झाले आहे. राहता राहिला महाराष्ट*. या राज्यात हे स्थान पवारांच्या युतीवर अवलंबून आहे. पण पवारांनी वार करायला सुरूवात केली आणि युती मोडली तर महाराष्ट*ही हातातून जाणार.  तेव्हा पवारांशी पटत नाही आणि त्यांच्यावर डाफरताही येत नाही. केवळ महाराष्ट*च नाही तर अनेन राज्यांत काँग्रेस हे प्रादेशिक पक्षांच्या हातातले खेळणे झाले आहे. खेळणे झाल्याने हा पक्ष तिथे खंगत आहे पण त्यामुळे चिडून त्या प्रादेशिक पक्षाचा हात सोडावा तर बिहार सारखी अवस्था होत आहे. विलक्षण कोंडी आहे.

Leave a Comment