कैलाश खेरची सचिनला अनोखी भेट

परसिद्ध गायक कैलाश खेरने सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ एक गाणं लिहायचं ठरवलं आहे. सध्या कैलाश खेर त्याच्या ‘रंगीला’या अल्बमच्या प्रचारासाठी भारताबाहेर आहे. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत  कैलाश खेरने नुकतीच ढाकामध्ये सचिन तेंडुलकरची भेट घेतली. त्याच्या दोन दिवसांपूर्वीच सचिनने आपलं शंभराव शतक पूर्ण केलं होतं. सचिनच्या या  कामगिरीवर खूश होऊन सचिनला भेट देण्यासाठी कैलाशने सचिनवर खास गाणं तयार करायचं ठरवलं आहे. या गाण्यातून सचिनच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे असे कैलाशने सांगितले.