नागपुरातही स्वाइन फ्लू

नागपूर,दि. ३ – पुणे, मुंबईत दाखल होऊन १०च्यावर बळी घेणारा स्वाईन फ्लू हा गंभीर आजार आता नागपुरातही येऊन धडकला आहे. या आजाराची लागण झालेल्या एका युवकावर मेडिकलमध्ये उपचार सुरु आहे.
  मेडिकलमध्ये उपचार घेत असलेला १९ वर्षीय तरुण हा भद्रावतीचा असून तो पुण्याला शिक्षण घेत आहे. तो काही कामानिमित्त मुंबईला गेला होता. मुंबईला गेल्यावर या तरुणाची प्रकृती अचानक बिघडली. त्याला ताप, घशात खवखव, हात पायासह शरीराच्या वेगवेगळ्या भागात दुखणे असा त्रास होऊ लागला. मुंबईत त्याने एका डॉक्टरकडे ३१ मार्च रोजी तपासणी केली. नमुने मुंबईच्याच रेलिगेयर लॅब येथे तपासणीकरिता पाठवण्यात आले. तेथे तो पॉझिटिव्ह आढळून आला. स्वाईन फ्लू झाल्याचे कळताच तरुण घाबरून नागपूरला आला. तरुणाचा भाऊ जाफरनगरात राहतो. तो भावाकडे गेला. आजाराविषयी माहिती सांगितली.

Leave a Comment