अखिलेश यादव यांच्याकडे ५० खाती

लखनौ, दि. १९ – उत्तरप्रदेशचे नवे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी स्वतःकडे ५० खाती राखून ठेवली आहेत. त्यात गृह, अर्थ, उत्पादन शुल्क, साखर, ऊस विकास, घर बांधकाम, उच्च शिक्षण, उर्जा आणि औद्योगिक विकास या खात्यांचा समावेश आहे. रविवारी मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले  असून अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव २००३ ते ०७ सालादरम्यान मुख्यमंत्री असताना त्यावेळच्या मंत्र्यांकडे देण्यात आलेली खाती आताही त्यांनाच देण्यात आली आहे. 

Leave a Comment