दबंग -२ चे हक्क ५० कोटीला

सलमानच्या दबंग या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली. दबंगच्या यशानंतर आता अरबाज खान दबंगच्या सिक्वेलच्या तयारीला लागला. मार्च महिन्यापासून दबंग -२ च्या शुटींगला सुरवात होणार आहे. दबंग -२ मध्ये सुद्धा सलमानची दबंगाई आपल्याला पाहायला मिळणार आहे.विशेष म्हणजे सिनेमाचं शुटींग सुरु होण्यापूर्वीच दबंग -२चे हक्क विकले गेले असल्याची बातमी आहे. स्टार नेटवर्कने दबंग-२ चे टेलिव्हिजन हक्क तब्बल ५० कोटींना विकत घेतले आहेत. सलमानच्या दबंगने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. दबंग- २ सुद्धा बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करेल असा विश्वास स्टार नेटवर्कच्या अधिकार्‍यांना आहे यामुळेच शुटींग सुरू होण्यापूर्वीच तब्बल ५० कोटी त्यांनी मोजले आहेत.

Leave a Comment