राजकीय हेतू साधण्यासाठीच काँग्रेस मुसलमानांचा वापर करीत आहे – गडकरी

बुलंदशहर,दि.२५- फक्त निवडणुका आल्या की काँग्रेसला मुस्लीम बांधवाची आठवण येते. आम्ही अल्पसंख्यांक कोटयाला कदापि पाठिंबा देणार नाही असे वकत्वय भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी बुलंदशहरातील निवडणूक रॅलीत केले आहे.मागासवर्गीय २७ टक्के आरक्षणामध्ये अल्पसंख्यासाठी उपकोटा करण्यावर आमचा विरोध आहे. मुसलमांनासाठी वेगळे आरक्षण हे फक्त काँग्रेसचे नाटक आहे. काँग्रेस सरकार स्वताःच्या लाभापायी मुसलमानाचे शोषण करीत आहे, असाही आरोप गडकरी यांनी युपीए सरकारवर लगावला. उत्तर प्रदेश मध्ये भाजपची सत्ता आली तर राम मंदीर बांधण्यामधील सर्व अडथळे आम्ही दूर करु असे वचन ही गडकरी यांनी यावेळी दिले.

Leave a Comment