मुंबई-‘नोकरी डॉट कॉम’ या नोकरी विषयक संकेत स्थळाकडून करण्यात आलेल्या पाहणीनुसार २०१२ च्या पहिल्या सहा महिन्यांत नव्या नोकर्यांच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होणार आहेत. या पाहणीत नोकरी देऊ करणार्या एक हजारांहून अधिक कंपन्यांशी संवाद साधण्यात आला. त्यापैकी ७२ टक्के कंपन्यांनी हा अंदाज व्यक्ती केला. मात्र, सहा महिन्यांपूर्वीच्या पाहणीपेक्षा आताच्या पाहणीत सकारात्मक सूर उमटण्याचे प्रमाण कमी झालेले आढळून आले.
जुलै २०११ मध्ये वर्षातील उर्वरित सहा महिन्यांमध्ये नव्या नोकर्या उपलब्ध होण्याबाबत ७८ टक्के कंपन्या आशावादी होत्या. तर ताज्या पाहणीत ७२ टक्के मालकांनी २०१२ च्या पहिल्या सहा माहीत नव्या नोकर्या निर्माण होतील असे म्हटले आहे. नोकर्यांच्या वाढीबाबत सर्वसामान्यपणे सकारात्मक वातावरण असले तरी ऑटो, बँकिग, फार्मा व बांधकाम क्षेत्रात याबाबत फारशी अनुकूलता दिसून आली नाही. बाजारातील नोकरीच्या संधी आणि वेतनवाढीच्या शक्यतवर प्रकाशझोत टाकणारी ही पाहणी वर्षांतून दोनदा केली जाते. या वर्षात कर्मचार्यांच्या वेतन वाढीबाबत १५ टक्के कंपनींनी ५ टक्क्यांहून कमी वेतनवाढ करणार असलयाचे सांगितले.
३२ टक्के कंपन्या १० ते १५ टक्क्यांदरम्यान, तर ३१ टक्के कंपन्या १५ ते २० टक्क्यांदरम्यान वेतनवाढ देवू इच्छितात. कर्मचार्यांचा अपेक्षित अनुभव ४ ते ८ वर्षांचा असावा अशी अपेक्षा ४४ टक्के कंपनींनी व्यक्त केली. ३४ टक्के कंपनींना १ ते ३ वर्षांचा, ९ टक्के कंपनींना ८ ते १५ वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे तर ११ टक्के कंपनी नवोदितांना संधी देणास उत्सुक आहेत.