हिरोइनची तुलना द डर्टी पिक्चर

मधुर भांडाअरकरचा आगामी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या हीरोइन चित्रपटाची तुलना द डर्टी पिक्चरसोबत होत असल्याने करिना कपूर खूपच नाराज आहे.  मधुर भांडारकर दिग्दर्शित हीरोइन हा चित्रपट हॉलीवूड अभिनेत्रीच्या जीवनावर आधारित आहे, तर विद्याचा डर्टी पिक्चर हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारित  होता. दोन्ही चित्रपट अभिनेत्रींच्या आयुष्याशी संबंधित असले तरी हीरोइन सिनेमा डर्टी पिक्चरपेक्षा अतिशय वेगळा आहे, असे करिनाने म्हटले आहे. दोन्ही चित्रपटाची कथा ही अत्यंत वेगळी असल्याचे तिने सांगितले. मात्र, आता मधुरचा  हीरोइन हा चित्रपट कितपत यशस्वी होतो हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

Leave a Comment