शोभा डे यांनी सुचवले बेटी ‘बी‘ चे नाव ‘अभिलाषा‘

नवी दिल्ली-अभिषेक बच्चन आणि एैश्वर्या राय-बच्चन कन्यारत्नानंतर आता चर्चा आहे तिचे नाव काय ठेवणार याची? बच्चन कुटुंबीयाच्या चाहत्यांनी या राज कन्येसाठी अनेक नावे सुचवली आहेत. त्यात शोभा डे यांनीही नाव सुचवले आहे. अभिलाषा असे नाव डे यांच्याकडून सुचविण्यात आले आहे.या नावामध्ये अभि-एैश या दोघांच्या नावाचाही समावेश आहे. तसेच बच्चन कुटुंबीयाकडून नामकरणाचा असा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पण डे आणि बच्चन कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध पाहता हे नाव ठेवण्यात वावगे नसावे अशी चर्चा सुरु आहे.

Leave a Comment