महाराष्ट्रात उन्ह्याळ्याला सुरुवात

कडाक्याच्या थंडीला विश्रांती मिळाली असून ऋतुमाना नुसार उत्तरायण सुरु होवून खर्‍या अर्थाने उन्ह्याळ्याला सुरुवात झाली आहे. पुर्वेकडील राज्यातून येणार्‍या वार्‍यात आद्रतेचे प्रामाण कमी असल्याने आढवड्याभरातच मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवू लागला असल्याचे पुणे वेधशाळे कडून सांगण्यात आले आहे. काल पुणे शहरात  ३५.४  कमाल तापमानाची तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ११.२ अंश सेल्सिअस  नोंदवण्यात आले  आहे.
पुर्वेकडील राज्यातून येणार्‍या कोरड्या वार्‍यामुळे उकाड्याचे प्रामाणात वाढ झाली आहे. तसेच आरबी समुद्रा वरुन येणार्‍या बाष्प युत्त* वार्‍यांमुळे काही ठिकाणी ढगाळ वातावतण निर्माण झाले आहे. मध्य महाराष्ट* आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात आणि उर्वरीत मध्यमहाराष्ट*ात तसेच मराठवाड्यात काही तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. राज्यात येत्या ४८ तासात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून किमान तापमान १५ तर कमाल ३५ अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. मात्र, अरबी समुद्रा जवळ असणार्‍या मुंबई शहरात किमान  तापमान १७ अंश सेल्सिअस तर कमाल ३८ अंश सेल्सिअस असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.   

राज्यात सकाळी ८ वाजता नोंदवण्यात आलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई-२१.५, सांताक्रुझ-१७.६, अलिबाग-१९.८, रत्नागिरी-१८.७, पणजी-२२.८, डहाणू-१२.१, पुणे-१२.८, अहमदनगर-११.६, जळगाव-११.२, कोल्हापूर-१९.९, महाळेश्वर-१७.८, मालेगाव-१५, नाशिक-१२.६, सांगली-१७.१, सातारा-१४, सोलापूर-१८.७, औरंगाबाद-१६.४, परभणी-१६, अकोला-१६, नागपूर-१५.