मुख्यमंत्र्यांची भविष्यवाणी

जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या काही विशिष्ट नेत्यांच्या मुलाखती काही वृत्तपत्रात प्रसिद्ध होत आहेत. त्यामध्ये काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची एक मुलाखत सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत त्यांनी शिवसेना हा पक्ष संपून जाईल, असे भाकित वर्तविले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातून सत्ता गेल्यामुळे ते निष्प्रभ झालेले आहेत आणि असाच त्यांचा प्रभाव कमी कमी होत जाऊन या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या हातून महापालिकेची सत्ता हिसकावून घेण्यात काँग्रेस आणि राष्ट*वादी काँग्रेसच्या युतीला यश येईल. एकदा मुंबईतली सत्ता हातातून गेली की, शिवसेनेचा सर्वत्र असलेला प्रभाव आपोआपच ओसरायला लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. त्यांचे हे भाकित कितपत खरे ठरेल हे काळच ठरवणार आहे. पृथ्वीराज चव्हाण हे काही ज्योतिषी नाहीत. शिवसेनेचा प्रभाव कमी होईल हा त्यांचा राजकीय अंदाज आहे आणि राजकारणामध्ये असे अंदाज व्यक्त करण्याला विशफुल थिकिग म्हणतात. म्हणजे जी गोष्ट घडावी असे आपल्याला वाटत असते ती गोष्ट घडणार आहे असे भाकित करणे. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांचे शिवसेना संपून जाईल हे भाकित हा विशफुल थिकिगचा प्रकार आहे.

शिवसेना संपावी असे त्यांना वाटत आहे. लोकशाहीमध्ये ज्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला विरोधक नेस्तनाबूत व्हावेत असे वाटते त्या नेत्याला लोकशाही समजली नाही, असेच म्हणावे लागेल. कारण लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाइतकाच विरोधी पक्ष सुद्धा महत्वाचा असतो. त्यामुळे विरोधक प्रबळ असले पाहिजेत, त्यांनी सरकारच्या चुका दाखवल्या पाहिजेत, आपल्या कारभारातल्या चुका दाखवल्यानेच आपला कारभार निर्दोष होणार असतो अशी खर्‍या लोकशाहीनिष्ठ नेत्याची इच्छा असते आणि उदारमतवादी ज्येष्ठ नेते विरोधी पक्षनेत्यांचा सन्मान करत असतात. एखादा पक्ष सत्तेवर आला आहे याचा अर्थ तो पक्ष फार निर्दोष आहे आणि त्यातले सगळे नेते कर्तबगारच आहेत असा होत नाही. गुणवत्ता विरोधी पक्षात सुद्धा असू शकते आणि राज्याचा कारभार चांगला करायचा असेल तर खरा कुशल मुख्यमंत्री विरोधी पक्षातल्या अनुभवी लोकांचा यासाठी उपयोग करून घेत असतो. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गेल्या ६० वर्षांपासून जागतिक राजकारणावर प्रगाढ चितन केलेले आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षात होते तरीही पी.व्ही. नरसिह राव यांनी त्यांना संयुक्त राष्ट*ातील भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. कारण तिथे संबंध भारताच्या प्रतिष्ठेचा होता आणि अशा प्रसंगी संकीर्ण पक्षीय विचार करून देशाचे नुकसान करणे योग्य नाही हे नरसिह राव यांच्या लक्षात येत होते. म्हणून त्यांनी संयुक्त राष्ट* संघटनेतल्या दोन कसोटीच्या प्रसंगांना अटलबिहारी वाजपेयी यांनाच तिथे पाठवले. अटलबिहारी वाजपेयी यांनी सुद्धा हाच कित्ता गिरवला. देशातल्या आपत्तींच्या संबंधात काही विषय समोर आला. भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनात कोण चांगले काम करू शकेल, असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा श्री. वाजपेयी यांना किल्लारीच्या भूकंपानंतरचे पुनर्वसन काम केलेल्या शरद पवारांची आठवण आली आणि त्यांचा पक्ष कोणता आहे याचा विचार न करता वाजपेयी यांनी शरद पवार यांची आपत्ती निवारण यंत्रणेच्या अध्यक्षपदी निवड केली.

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे वशविद्वेश विरोधी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये जाणार्‍या भारताचे प्रतिनिधी मंडळाचे नेते म्हणून वाजपेयी यांनी श्री. सुशीलकुमार शिदे यांची निवड केली. त्याही वेळी वाजपेयी यांनी पक्ष पाहिला नाही, देश पाहिला आणि विरोधी पक्षात सुद्धा कर्तबगार नेते आहेत याची जाणीव ठेवली. पृथ्वीराज चव्हाण यांनी या गोष्टींपासून फार काही शिकण्याची गरज आहे. आपल्या राज्यातला विरोधी पक्ष संपून जावा ही त्यांची कल्पना लोकशाही विरोधी आहे. शिवसेना हा पक्ष प्रादेकि असला तरी सुद्धा महाराष्ट*ाच्या एका गरजेतून निर्माण झाला आहे. शिवसेनेची कार्यपद्धती आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्वांनाच पटतील असे काही नाही. परंतु हा पक्ष वाढला, मोठा झाला आणि सत्तेपर्यंत पोचला याचा अर्थ समाजाच्या एका वर्गाला नक्कीच त्याची गरज होती. कदाचित पृथ्वीराज चव्हाण यांना माहीत नसेल पण महाराष्ट*ाची ही गरज आणि मराठी माणसाचा आवाज या गोष्टीची जाणीव काँग्रेसच्याही नेत्यांना होती. परंतु काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे, म्हणून त्यांना मराठी माणसाचा आवाज बुलंद करता येत नव्हता. ते काम शिवसेना करत आहे ही गोष्ट काँग्रेसमधल्याही काही नेत्यांना आवडत होती. म्हणून शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनीच शिवसेनेला मोठे केलेले आहे. १९९२ सालच्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळाले. त्यावेळी वसंतदादा पाटील यांनी शिवसेनेला मदत केलेली होती. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना संपावी असे म्हणणे किवा तशा भावनेतून शिवसेना संपेल असे भाकित करणे हे लोकशाहीच्या दृष्टीने तर घातक आहेच, पण महाराष्ट*ाच्या दृष्टीने सुद्धा काही बाबतीत तरी निश्चितच घातक आहे.

Leave a Comment