अश्लिल चित्रफित पाहणार्‍या मंत्र्यांचे राजीनामे मंजूर

बंगळुरू-विधिमंडळ सभागृहात अश्लिल चित्रफित बघणार्‍या भाजपच्या तीन मंत्र्यांचे राजीनामे कर्नाटकचे राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनी बुधवारी स्विकारले.कर्नाटक राज्याचे सहकार मंत्री लक्ष्मण सावदी, महिला आणि बालकल्याण मंत्री सी. सी. पाटील आणि बंदर मंत्री कृष्णा पालेमार अशी राजीनामे दिलेल्या मंत्र्यांची नावे आहेत. विजापूर जिल्हयातील सिदगी येथे पाकिस्तानी झेंडे फडकाविल्यावरून सभागृहात जोरदार गदारोळ सुरू असताना हे तिन्ही मंत्री मात्र अश्लिल चित्रफित पाहण्यात मग्न होते. दरम्यान भाजप पक्षातील या मंत्र्यांमुळे भाजप अडचणीत सापडला आहे.

Leave a Comment