
पुणे-मुंबईत अनेक मैदाने असताना शिवाजी पार्कसाठीच आग्रह धरणे योग्य नाही असे मत व्यत्त* करत राष्ट*वादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच शिवसेनेची बाजू उचलून धरली होती. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र काकांच्या भूमिकेला छेद देत आणि राज ठाकरे यांच्या सुरात सुर मिळवत राज यांच्या शिवाजी पार्कवर सभा घेण्याच्या मागणीत काय चूक आहे? असा सवाल उपस्थित केला. लोकशाहीत कोणत्याही पक्षाला निवडणुकांच्या काळात सभा घेण्याचा अधिकार असून प्रत्येक पक्षाला मैदाने मिळाली पाहिजेत असे सांगतानाच शिवाजी पार्कबाबत आपण निवडणुक आयोगाकडे विनंती करु, अशी ग्वाहीही दिली.
अगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काल अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवाजी पार्कबाबतच्या विषयावर बोलताना पवार यांनी राज यांच्या भूमिकेचे समर्थन केले. प्रत्येक पक्षाला प्रचारादरम्यान आपले विचार जनतेसमोर मांडण्यासाठी सभा घेणे गरजेचे असते. शिवाजी पार्क ‘सायलेन्ट झोन’मध्ये आहे, त्याबाबत दुमत नाही. मात्र, ज्या प्रकारे गणेशोत्सवाच्या काळात काही दिवस ध्वनी प्रदुषणाचे नियम शिथील करुन देखाव्यांना मान्यता दिली जाते त्याप्रमाणे निवडणुकांच्या काळातही न्यायालयाने काही दिवस नियम शिथील करण्यास काय हरकत आहे. राजकीय सभा या पाच वर्षातून एकदा निवडणुकांच्या काळातच होतात. तेव्हा निवडणुका लढवणार्या पक्षांना प्रचाराच्या काळात प्रत्येकाला एक दिवस सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी. आपल्याला न्यायालयाचा अवमान करायचा नाही मात्र,व्यापक जनहिताचा विचार करुन न्यायालयाने सभांना परवानगी द्यावी, असेही ते म्हणाले.
शिवाजी पार्कवर सभा घेण्यास न्यायालयाने परवानगी नाकारल्याने राज ठाकरे यांचा रस्त्यावर सभा घेण्याचा निर्णयही योग्यच असून अशा प्रकारे परवानगी नाकारल्यास कोणताही पक्ष हाच निर्णय घेईल असेही पवार म्हणाले. राष्ट*वादी काँग्रेसलाही सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान हवे आहे. यासंदर्भात आपण पक्षातील सहकार्यांशी बोलणार असून निवडणुक आयोगाकडेही याबाबत परवानगीची मागणी करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
