विनोद कांबळीमध्ये सचिनइतकी झोकून देण्याची शक्ती आहे का-शरद पवार यांचा सवाल

नवी दिल्ली,दि.२४नोव्हेंबर-१९९६ च्या विश्वचषक सामन्यातील उपांत्य फेरीत मॅच फिक्सींग झाल्याचा खळबळजनक आरोप विनोद कांबळी याने केला होता.आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तडाखेबाज फलंदाजी करीत विनोद कांबळीच्या या आरोपंाचा समाचार घेतला. विनोद कांबळी १९९६ नंतर इतकी वर्षे गप्प का बसला होता, असा सवाल खुद्द पवारांनी त्यांना विचारला आहे. जर कुठेही सामना सुरु नसेल तर सचिन तेंडुलकर बांद्रा – कुर्ला कॉम्पलेक्समध्ये सराव करीत असतो. सकाळी ९ च्या ठोक्याला तो सराव सुरु करतो तेवढे डेडीकेशन विनोद कांबळीमध्ये दिसत नाही. खरेतर विनोद हा सचिनच्या तोडीचा खेळाडू आहे, मात्र इतर गोष्टींकडे लक्ष देऊन त्याने खेळाकडे दुर्लक्ष केल्याची टीका पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस – राष्ट*वादी काँग्रेसला याचा फटका बसेल का? या प्रश्नावर शरद पवार यांनी मार्मिक भाष्य केले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फारसा फटका बसणार नाही, असे सांगून ते म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत अण्णा हजारे यांनी आमच्या एका उमेदवाराचा प्रचार केला होता. तो उमेदवार सर्वात कमी मतांनी निवडून आला. पवार यांचा रोख गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे होता. या विधेयकाच्या कक्षेत पंतप्रधानांना आणण्यास आपला विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान हे व्यक्ती नसून ती एक संस्था आहे. संस्थेला लोकपालाच्या कक्षेत आणण्यास आपला विरोध आहे, असे पवार यांनी नमूद केले. गुजरातमध्ये नवे प्रकल्प व्हावेत, यासाठी तेथील लोक प्रयत्नशील आहेत, मात्र महाराष्ट*ात एखादा प्रकल्प होऊ नये यासाठी लोक प्रयत्नशील असल्याची टीका त्यांनी केली.

Leave a Comment