ऊस दराच्या ‘चर्चेचे गुर्‍हाळ’ फिसकटले: संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा शेतकरी संघटनांचा इशारा

पुणे- राज्यात चक्काजाम आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले उस उत्पादक शेतकरी आणि राज्यशासन यांच्यात आज चर्चेतच्या तिसर्‍या फेरीतही अूस भावाचा आणि पहिल्या उचलीबाबतचा निर्णय होअू शकला नाही.शेतकर्‍यांनी केलेल्या साडेएकवीसशे ते बावीसशे रुपये टन येवढ्या भावावर आपल्या मुख्यमंत्र्यांशी बोलावले लागेल, असे म्हणून सहकारमंत्री यांनी येथे साखरसंकुलात सुरु असलेल्या चर्चेच्या दुसर्‍या दिवशीही काही निर्णय देण्यास असमर्थता दर्शविली .चर्चेची पुढची फेरी उद्या शुक्रवारी घेण्याचे ठरविण्यात आले. तर ‘हे सरकार वेळ काढूपणा करत आहे अशी प्रतिक्रिया उस उत्पादक शेतकरी संघटना आणि स्वाभिमान संघटना यांच्या  यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त करून संताप व्यक्त केला.  या संघटनांनी चक्काजाम आंदोलन अधिक उग्र करण्यात येईल व उद्या महाराष्ट* बंद राहील अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. बारामती येथे गेले चार दिवस उपोषणास बसलेले स्वाभिमानी संघटनेचे खासदार यांनी उद्याच आम्ही सहभागी होत असलेली चर्चेची अंतीम फेरी राहील व यापुढे आम्ही फक्त आंदोलनाच्या भाषेत बोलू असे बोलून दाखविले. एका बाजूला चर्चेची फरी, दुसर्‍या बाजूला उपोषण सुरु असताना राज्यात वीस ठिकाणहून अधिक ठिकाणी चक्काजाम आंदोलनाला उग्र स्वरुप मिळाले आहे. या आंदोलनात भाजपा, शिवसेना आणि मनसे यांनीही उडी घेतली आहे. आज बारामती शहरात व तालुक्यात जवळ जवळ सर्वत्र बंद पाळण्यात आला. बारामती व शरदराव पवार यांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीयेथे तर कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनास सहभागी होण्यासाठी राज्यातील दहा हजारापेक्षा अधिक शेतकरी सध्या बारामतीयेथे ठाण मांडून बसले आहेत.
आजच्या चर्चेत राज्यसरकारच्या वतीने सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व साखरसंघाचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील यांचा समावेश होता. स्वाभिमानी संघटनेच्या वतीने सदाभाउ खोत, शेतकरीसंघटनेच्या एका गटाच्या वतीने रघुनाथदादा पाटील तर शेतकरीसंघटना शरद जोशी गटातफर्े अनिल धनवट यांनी भाग घेतला. काल रात्री दीड वाजेपर्यंत झालेल्या चर्चेतूनही काही तोडगा ज्या प्रमाणे निघाला नाही त्याच प्रमाणे आजही तोडगा निघाला नाही. आज स्वाभिमान संघटनेने २३५० रुपये पहिली उचल मागण्यातून थोडेशी पिछेहाट दाखवत बावीसशे रुपयापर्यंत खाली येण्याची तयारी दर्शविली. रघुनाथदादा गटाने हीच तयारी एकवीसशे पन्नास अशी दर्शविली. पण या मागणीप्रमाणे राज्यातील सर्व साखरकारखान्यांना असा भाव देणे परवडेल का यावर मी सहकारमंत्री या नात्याने एकटा निर्णय करू शकत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांशी बोलणी करण्यासाठी उद्यापर्यंत थांवावे, असे आवाहन श्री हर्षवर्धन पाटील यांनी या शेतकरी प्रतिनिधिना केले. त्यावर रघुनाथदादा पाटील म्हणाले, राज्य सरकार आज वेळकाढूपणा करणार अशी कल्पना मला कालच आली होती व तसेच झाले. या आज आम्ही मांडलेले आकडे काही नवे नव्हते मग या सरकारच्या प्रतिनिधींना सर्व निर्णय घेण्याचा अधिकार असताना ते वेळकाढूपणा करीत आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की, आम्ही मागत असलेला दर देण्याची त्यांची मानसिकता नाही. अुद्याही त्यांनी असाच काळकाढूपणा केला तर आम्ही त्यापुढे चर्चेलाही कदाचित बसणार नाही.
स्वाभिमान संघटनेचे श्री सदाभाउ खोत म्हणाले,चर्चेंच्या गेल्या तीनही फेर्‍यात आम्हीच फक्त उत्पादनखर्चावर व साखरेच्या विद्यमान दरातून तो देणे शक्य असल्याचे पटवून देत आहोत. पण सरकार कसलाही प्रतिसाद देत नाही. आपण चर्चेने प्रश्न सोडवू असे मोघम बोलत आहे. राज्यातील शेतकरी या विषयावर प्रथमच संघटित होत आहे.आणि तो आंदोलनात अुतरत आहे या परिस्थितीत जर सरकारला अग्नीची परीक्षा घेणे योग्य वाटत असेल तर सरकारचा तो आत्मघात ठरेल.

Leave a Comment