पाच हजाराची लाच घेताना महिला पोलीस निरीक्षकाला अटक

पुणे,दि.२७ – मशिदीतील अतिक्रमणावरील कारवाई टाळण्यासाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या एक पोलीस निरीक्षक माया बनकर यांना आज दुपारी शिवाजीनगर पोलीस चौकीत पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले. या घटनेची पाश्र्वभूमी अशी की, शिवाजीनगर भागातील एका मशिदीचेमुख्य याकूब शेख यांनी मशिदीला लागून असलेल्या त्यांच्या सायकलस्टॅण्डसाठी काही जागा मशिदीच्या भितीच्या आत अतिक्रमण केले होते. त्यांचा कार्यकाल संपल्यावर नवे ट्रस्टी इकबाल शेख यांनी आधीच्या ट*स्टीबाबत तक्रार केली होती. त्याचा तपास निरीक्षक माया बनकर यांच्याकडे आला होता व त्यांनी तपासाची दिशा याकूब यांना अनुकूल ठेवण्यासाठी पाच हजार रुपयांी रक्कम मागितली.ती रक्कम आज त्यांना देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगे हात पकडले व अटक केली.

Leave a Comment