भ्रष्ट सरकारविरुद्ध विरोधक एकत्र आल्याने विजय निश्चित – मुनगंटीवार

पुणे, दि.२७ – विरोधी पक्षात मतदान विखुरले गेल्याने मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये अवघे तेहसीस टक्के मतदान असूनही काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात आले आहे; परंतु खडकवासला पोटनिवडणूक ही भ्रष्टाचार, महागाई  आणि ‘टगेशाही’ जोपासणार्‍या आघाडी  सरकार आणि इतर सर्व विरोधी पक्षांची आहे. त्यामुळे भाजप- शिवसेना- रिपाइं (आठवले गट) चे उमेदवार भीमराव तापकीर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केला.
युतीचे उमेदवार भीमराव  तापकीर यांच्या  प्रचाराच्या नियोजनाच्या बैठकीसाठी आलेल्या मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवसेनेच्या संफनेत्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे,  रिपाइंचे कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, आमदार गिरीष बापट, माधुरी मिसाळ, महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, चंद्रकांत पाटील, माजी आमदार  शरद  ढमाले, शिवसेनेचे  शहरप्रमुख नाना वाडेकर, भाजपचे शहरअध्यक्ष विकास मठकरी, रिपाइंचे शहर अध्यक्ष परशुराम वाडेकर, मातंग एकता आंदोलनचे अध्यक्ष हनुमंत साठे, भाजपच्या गटनेत्या मुक्ता टिळक, श्याम देशपांडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
मुनगंटीवार  म्हणाले, मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या निधनामुळे रि*त झालेल्या जागेवर हर्षदा वांजळे यांनी निवडणूक लढविली असती, तर त्यांना एकवेळ सहानुभूती मिळाली असती; परंतु त्यांनी भ्रष्टाचार, टगेगिरी  करणार्‍या  राज्यातील सत्ताधार्‍यांकडून उमेदवारी घेतली आहे. गांवकरी,  शेतकरी आणि  वारकर्‍यांवर गोळीबार करणार्‍या या राष्ट*वादी काँग्रेसला  जनता  मतपेटीतून धडा  शिकविल्याशिवाय  राहाणार नाही. महापालिका आणि राज्यात यांचीच सत्ता असताना विकास आराखड्याचा प्रश्न आघाडीला सोडविता आला नाही. यामुळे खडकवासल्याचा विकास रखडला आहे. यामुळे जनता राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीला वैतागली आहे.
आमदार गोर्‍हे  म्हणाल्या, युतीचे आमदार असलेल्या  भागाला जोडूनच हा मतदारसंघ आहे. मागील निवडणुकीत युतीचे शरद ढमाले यांनी या मतदारसंघाचे  प्रतिनिधीत्व केले  आहे. आघाडी सरकारला धडा शिकविण्यासाठी शिवशक्ति आणि भीमशक्ति एकजुटीने  प्रयत्न करेल. शेवाळे म्हणाले, शिवशक्ति आणि भीमशक्तिएकत्र  आल्याने राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळेल. आघाडीला पाठिंबा देणार्‍या गवई गटाने खडकवासला मतदार संघात त्यांचा एक कार्यकर्ता दाखवावा, असे आव्हानही शेवाळे यांनी गवई गटाला दिले.
राष्ट्रवादीचे पुतणा मावशीचे प्रेम – आमदार गोर्‍हे
खडकवासला मतदारसंघ ‘बारामती लोकसभा मतदार संघात’ येतो. त्यामुळे राष्ट*वादी काँग्रेसला वांजळे यांचा कळवळा आला. मावळात गोळीबार झाला तेंव्हाची राष्ट*वादीची भूमिका तपासून पाहिल्यास राष्ट*वादीचे खडकवासला मतदारसंघाबाबतचे पुतणा  मावशीचे प्रेम कळेल, असे चिमटा काढताना आमदार  डॉ. नीलम गोर्‍हे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टीका केली.

Leave a Comment