नॅनोचा खप फक्त १ हजार २०२

मुंबई दि.०५ सप्टेंबर- टाटा समुहात काम करणार्‍यांना सूट देवून नॅनोची विक्री वाढविण्याची शक्कल कंपनीने लढविली असली तरी त्यातही कंपनीला यश आलेले नाही. ही योजना जाहीर झाल्यानंतरही देशभरात केवळ १२०२ नॉनो कारची विक्री झाली. मध्यमवर्गीयांची कार अशी जाहीरात करीत बाजारात आणलेल्या नॅनो कारच्या विक्रीचे सर्वच प्रयत्न फसताना दिसत आहेत. कं पनीच्या एकू ण विक्रीतील घसरणीतही टाटांच्या लो बजेट नॅनोने महत्वाची भूमिका बजावली आहे. या महिन्यात नॅनोची विक्री तब्बल ८५ टक्क्यांनी घटली, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment