अण्णांनी नाकारली झेड सुरक्षा

राळेगणसिद्धी – देशाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी मरायला मी कशाला घाबरू ? मला मरणाची भिती नाही . यामुळे लवकर माझी झेड सुरक्षा व्यवस्था सरकारला परत करणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारें यांनी दिली.राळेगण सिद्धीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सुरक्षा व्यवस्था नाकारल्याची माहिती दिली.
देशाच्या स्वांतत्र्यलढ्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या स्वातंत्र्य सैनिकांना कुठे सुरक्षा व्यवस्था होती ? हदयविकाराचा झटका येऊन मरण्यापेक्षा देशासाठी मरणे नेहमीच चांगले आहे.यासंबंधी गृहमंत्री आर.आर.पाटील यांना लवकरच पत्र लिहून सुरक्षा व्यवस्था परत करणार आहे.आंदोलनात सहभागी झालेल्या नागरी समितीचे सदस्यांना सरकार त्रास देत असलल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.तसेच माझी प्रकृती सुधारणा होत असून वजन वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment