अण्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज,गणेश चतुर्थी राळेगणसिद्धीमध्ये

लोकपाल विधेयकाचे कर्ताधर्ता,अण्णा हजारेंनी आज केंद्र सरकारला आणखी एक धक्का देत रूग्णालयातून अचानक डिस्चार्ज घेतला. रात्रीच ते विमानाने पुण्याला रवाना झाले असून, गणेश चतुर्थीला ते राळेगणसिद्धीमध्ये असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अण्णा हजारेंनी आज दुपारी उशिरा आपल्या विश्‍वासू सहकार्‍यांशी चर्चा करून नवी दिल्लीहून पुण्याला जाणार्‍या शेवटच्या विमानाने रवाना होण्याचा निर्णय घेतला.  प्रसारमाध्यमांना याचा थांगपत्ता लागणार नाही, याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. अण्णांनी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास गुडगावच्या मेदांता मेडिसिटी रूग्णालयातून डिस्चार्ज घेतला. त्यानंतर डॉ. नरेश त्रेहन आणि अरविंद केजरीवाल यांच्यासह ते इस्पितळाच्या मागील बाजुला असलेल्या दरवाजाने प्रसारमाध्यमांना चुकवून विमानतळाकडे रवाना झाले.

दरम्यान, बाप्पाच्या आगमनाप्रमामे अण्णांच्याही आगमनाची राळेगणवासियांना उत्सुकता लागली आहे.

Leave a Comment