अमरसिहाची लवकरच तिहार यात्रा ?

अमरसिह हे पेज थ्री चे नेते मानले जात असत.ते आता समाजवादी पार्टीतून बाहेर पडले असून आपली एक छोटी पार्टी सांभाळत बसले आहेत.ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या विचारात आहेत आणि तिकडून बोलावणे कधी येतेय याची वाट पहात आहेत.त्यांनी आजवर मुलायमसिग मागे असल्याने  राजकारणात फारच गडबड केली. ते या  दशकातले  सर्वाधिक बोललेले, सर्वाधिक उपद्व्याप केलेले  नेते ठरले आहेत.  या गृहस्थाने केलले उपद्व्याप आणि बडबड कशासाठी केली असा प्रश्न तुम्हाला आम्हाला तर पडला आहेच पण खुद्द त्यालाही पडला आहे. त्याने केलले उद्योग एकूण निरर्थक असले तरी ते सगळे कायद्याला धरून नव्हते. त्यामुळे कायदा कधीना कधी कायदा आपले काम करतोच. केलेला उद्योग किती का निरुपद्रवी असेना  तो कायद्याच्या भाषेत गुन्हा या सदरात मोडणारा असला की कायदा त्याला आपल्या परीने घेतोच. आता  मनमोहनसिग यांचे सरकार वाचवण्यासाठी खासदार फोडण्याकरिता त्यांना पैसे दिल्याच्या प्रकरणात अमरसिह यांच्यासह सात जणांवर दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. या घटनेला तीन वर्षे झाली आहेत.  पण या संबंधात आता आरोपपत्र दाखल झाले आहे. या आरोपींना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली आता न्यायालयात खेचण्यात येईल. आरोप पत्र दाखल झालेल्यांत भाजपाचे दोन खासदार आणि पक्षाचे मार्गदर्शक सुधीन्द्र कुलकर्णी यांनाही आरोपी करण्यात आले आहे.        
    २००८ साली डाव्या आघाडीने मनमोहन सिंग सरकारचा पाठींबा काढून घेतला होता आणि सरकार अल्पमतात आले होते. पण या सरकारला समाजवादी पार्टीच्या ३६ खासदारांनी पाठिबा दिला त्यामुळे सरकारवरचे संकट अंशतः तरी टळले होते आणि आणखी काही खासदार गळाला लागण्याची गरज होती. त्यासाठी अमरसिग यांनी भाजपाच्या काही खासदारांना पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न केला.या खासदारांनी हे पैसे घेतले पण विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू असतानाच भर लोकसभेत या नोटांची पुडकी सर्वांसमोर उघडी केली आणि आपल्याला पक्षाच्या विरोधात जाऊन सरकारच्या बाजूने मते देण्यासाठी हे पैसे देण्यात आले आहेत असे  जाहीर करून खळबळ माजवून दिली.पोलिसांनी या प्रकरणात ज्यांना पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न झाला त्या खासदारांना आणि त्यांच्यापर्यंत पैसे पोचवणार्‍या मध्यस्थांनाही आरोपी करण्याचे ठरवले आहे. या प्रकरणात पैसे नेण्यासाठी वापरलेली गाडी, तिचा ड*ायव्हर आणि त्याने दिलेला पत्ता यावरून यात अमरसिग यांचा हात होता हे दिसायला लागले आहे. खरे तर हे सरकार काँग्रेसचे होते आणि ते वाचवण्याची जबाबदारी काँग्रेसची होती. पण, अमरसिग हे अती उत्साही कार्यकर्ते आहेत.
    त्यांनी मनमोहनसिग यांना आपण काही खासदार फोडू शकतो असे सांगून हा प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांना मनमोहनसिग यांच्याकडून शाबासकी मिळवायची होती. अशा प्रकारात काहीही कले तरी कसलीच कारवाई होत नसते या भ्रमात या लोकांनी हे सारे उपद्व्याप केले आहेत पण ते पचलेले नाहीत.पचले नाहीत हे खरे पण ते पचत आले होते. यामागे दोन कारणे होती. एकतर या प्रकरणात खासदारांची फोडाफोडी झाली आहे आणि ती फोडाफोडी काँग्रेसच्या हिताची होती म्हणून काँग्रेसवर तिचा आळ  घेतला गेला आहे. म्हणून या प्रकरणाचा तपास धीम्या गतीने केला जावा असे आदेश पोलिसांना देण्यात आले होते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावर आरोप असले की ते असे सावकाशीने घ्यायचे हा प्रघातच आहे. त्यातच अमरसिग यांनी समाजवादी पक्षाचा त्याग करून काँग्रेसशी चंबाचुंबी करायला सुरूवात केली होती.या प्रकरणात तेच अडचणीत येणार होते म्हणून सरकारने आता आपला झालेला हा माणूस अडचणीत येऊ नये  असा आदेश पोलिसांना दिला होता आणि दिल्लीचे पोलीस आपल्या धन्याचा आदेश शिरसावंद्य मानून धीम्या गतीने तपास करीत होते. हे असे नेहमीच होत असते. सत्ताधारी नेत्यांना असे झाकून घेतले जातच असते. पण या प्रकरणात ते फार जमले नाही
    प्रकरण उच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयाने या प्रकरणाचा तपास धीम्या गतीने केल्या बद्दल पोलिसांवर ताशेरे झाडले. न्यायालयाने पोलिसांनी तपास वेगाने करण्याची ताकीद दिली. तीन वर्षात काडीही न हाललेल्या या प्रकरणाच्या तपासाची गती न्यायालयाने तंबी देताच वाढली. केवळ तीन महिन्यातच अमरसिगांवर आरोपपत्र दाखल करून त्यांना अटक करण्यापर्यंत प्रकरण येऊन पोचले. याचा अर्थ असा की सरकारी तपास यंत्रणा सरकारच्या डोळ्याकडे पहात पहात कारवाई करीत असतात. न्यायालयासारखी निःपक्षपाती यंत्रणा कामाला लागली की मात्र त्यांनी मोकळीक मिळते आणि ते काही तासात मोठ्या आरोपीला अटकही करून आणतात. त्यामुळेच सरकारच्या विरोधातल्या प्रकरणांची चौकशी करण्यास निःपक्षपाती यंत्रणा असण्याची गरज आहे. आपल्या देशात सध्या तपास सुरू असलेल्या सर्व प्रकरणांत असे दिसून आले आहे की केवळ पोलीस किवा सीबीआय म्हणावा तसा तपास करू शकत नाहीत. त्यांना न्यायालयाकडून तंबी मिळाल्यावर त्या यंत्रणा चांगला तपास करतात. २ जी प्रकरणांतही तसेच झाले आणि आता या नोट फॉर नोट या प्रकरणातही तसेच दिसायला लागले आहे.

Leave a Comment