अण्णांसाठी पुण्यात कँडल मार्च

पुण्यातील सारसबाग येथे निघालेल्या अण्णा हजारेंच्या जनलोकपालविधेयक समर्थनाचा विद्यार्थ्यांचा कँडल मोर्चा म्हणजे दीप मोर्चा हा दोन किमी लांबीचा होता.अण्णांनी भ्रष्टाचारच्या विरोधात पुकारलेल्या आवाजाला पुणेकरांनी समर्थन दिले आहे.सरकारकडून सुटकेचे आदेश मिळाल्यानंतर देखील अण्णा आपल्या काही अटींसाठी तिहार तुरुंगात आहेत.पुण्यातील या मार्च्यात सर्व थरातील लोकांची उपस्थिती लक्षणीय होती.

Leave a Comment