अण्णांच्या समर्थनार्थ सोलापूरात जेलभरो, ८०० कार्यकर्त्यांना अटक

सोलापूर दि. १८ ऑगस्ट – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापूरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आले. यावेळी आंदोलन करणार्‍या  ८०० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 
 जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अटक करुन तिहार तुरूंगात डांबल्यानंतर अण्णांच्या समर्थनार्थ शहरात ठिक ठिकाणी मोर्चे, धरणे आंदोलन, मशाल मोर्चा तसेच रास्ता रोको करुन काँग्रेसी सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.  शहरात ठिकठिकाणी करण्यात आंदोलनात तरुणांनी मोठ्या प्रमाणात उस्र्फुत सहभाग नोंदविला. भ्रष्टाचार जन आंदोलन समितीच्यावतीने मंगळवापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते..
दरम्यान बुधवार  पासून  अस्तित्व मेकर्स, संवेदना युवा आणि संभाजी आरमार यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘भारताचा लिलाव थांबवा’ हे पथनाट्य सादर करुन काँग्रेस सरकारविरुध्द समान्य जनतेत असलेला  रोष व्यक्त केला .

Leave a Comment