अल् कायदा धोकादायक रसायन शस्त्र बनवण्याच्या तयारीत

न्यूयॉर्क – जागतिक दहशतवादी संघटना अल् कायदाचे येमेन तळावरील दहशतवादी एरंडापासून रिसिन नावाचे धोकादायक रसायन शस्त्र बनवण्याच्या तयारीत असून यामुळे कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर हिसाचार होण्याची शक्यता आहे. एरंडाच्या बिया आणि काही स्फोटकापासून रिसिन नावाचे शस्त्र तयार करण्याचा प्रयत्न दहशतवादी करीत आहेत. अमेरिकेवरील संभाव्य हल्ल्यात याचा वापर होण्याची शक्यता आहे. रिसिन बनवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून येमेन येथील दहशतवादी तयारी करत आहे.येमेनमधील शाबवा प्रांतात दहशतवादी एरंडाच्या बिया आणि काही स्फोटकापासून रिसिन तयार करत असल्याची माहिती अमेकिरकन गुप्तहेर खात्याला मिळाली आहे.या प्रकरणी गुप्तहेर खात्याच्या हाताला काही पुरावे मिळाले आहेत.