
बर्मिंगहॅम-सुमार गोलंदाजी,ढिसाळ क्षेत्ररक्षण त्यात फलंदाजांची हाराकिरी वृत्ती यामुळे पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.त्याचीच पूनरावृत्ती तिसर्या कसोटीत पाहायला मिळत असून तेथेही मानहानिकारक पराभव जवळपास निश्चित झाला आहे.यामुळे भारतीय संघ एका निराशेच्या गर्तेत गेला असून गेल्या दहा वर्षात पहिल्यांदा भारतीय संघाची अशी दयनीय अवस्था झाली असल्याची खंत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केली आहे.
