स्त्रीभ्रूण हत्येचा गुन्हा कलम ३०२ अन्वये नोंदविण्याची मागणी

मुंबई- मुलींचा गर्भावस्थेतच जीव घेणे हा खूनाचाच प्रकार असून अशा गुन्ह्यांत गर्भपात करणारा डॉक्टर आणि त्याच्याकडून गर्भपात करवून घेणारे पती – पत्नी  यांच्यावर भारतीय दंडविधान कलम ३०२ नुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी मंगळवारी विधान परिषदेत विनायाक मेटे यांनी केली. मेटे आणि अन्य सदस्यांनी नियम २६० अन्वये स्त्री भ्रूण हत्येबाबतचा प्रस्ताव मांडला होता. चर्चेत भाग घेताना शिवसेनेच्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी समाजातील मनोवृत्ती बदलण्याची गरज असल्याचे सांगून याबाबत सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल केला.

1 thought on “स्त्रीभ्रूण हत्येचा गुन्हा कलम ३०२ अन्वये नोंदविण्याची मागणी”

  1. varsha vilas dhuri

    srti bhrun hatyevar sadhya konatee kadask paule uchalanyat ali ahe? ani hya vishayi kam karanarya samajik sanstha kuthe kuthe karyarat ahet?

     

Leave a Comment