शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस साजरा

पुणें- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस आज महाराष्ट्रतून आलेल्या त्यांच्या अनुयायांनी शिवकालीन वातावणरात साजरा केला. पहाटेपासूनच त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली होती. पुण्यातील शिवप्रेमींनी त्यांचा पर्वती पायथ्याचा पुरंदरे वाडा सजविला होता. मंगलवाद्ये आणि रस्त्यावर अनेक मंडळांनी चालवलेला ढोलवाद्यांचा नाद तेथून जाणार्‍या प्रत्येकाचे लक्ष वेधत होता. पुण्यातील नादब्रह्म मंडळाच्या शंभर युवक व युवतींनी सायंकाळी पन्नास पेक्षा अधिक ढोल आणि तेवढेच ताशे यावर अनेक नाद सादर केले. त्यातील युवतींचा ढोल वाजविण्यातील उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. सायंकाळी सांगलीचे संभाजीराव भिेडे यांच्या पुढाकाराने शिवप्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या पारंपारिक वेषात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते.

Leave a Comment