…यापुढे प्रसारमाध्यमे म्हणजे वाहिनी,नेट,मोबाईल आणि न्यूयॉन साईनही

न्यूयॉर्क टाईम्स या जगातील आघाडीच्या वृत्तपत्राने आठ महिन्यापूर्वी ‘कदाचित पुढील एक दोन वर्षात आम्ही मुद्रित आवृत्ती रद्द करू’ अशी घोषणा केल्यापासून जगातील सर्वच दैनिकांनी आपली धोरणे निराळ्या दिशेने आखायला आरंभ केला. याचा अर्थ जगातील मुद्रित वृत्तपत्रे बंद पडतील असा नव्हे पण माहिती तंत्रज्ञानाचे युग सुरु झाल्यापासून वृत्तपत्रांना दररोज या तंत्रज्ञानातील नव्या घटनांचा वेध घ्यावा लागत आहे व बदलाला तयार व्हावे लागत आहे, हे निश्चत. भारतीय लोकजीवनात वृत्तपत्रांना आदराचे स्थान आहे. कारण भारतातील पत्रकारितेची सुरुवात ब्रिटिशांशी स्वातंत्र्य लढा लढण्यातून सुरु झाली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरु केले ते प्रामुख्याने विदेशी मिशनर्‍यांच्या धर्मांतराच्या प्रचारास उत्तर देण्यासाठी आणि ब्रिटिशसाम्राज्यवादाचे जोखड उलथवून टाकण्यासाठी केले. लोकमान्य टिळक ही पुढची पिढी. एकेकाळी लोकमान्यांचे अग्रलेख हे उपनिषदांच्या दर्जाचे मानले जायचे. पण बाळशास्त्री आणि टिळक यांच्यातील समान दुवा म्हणजे लोकमान्यांचे ‘बाळ’ हे नाव बाळशास्त्री जांभेकर यांचा लढावू बाणा बघून ठेवले होते. चळवळीच्या काळातून वृत्तपत्रे हळूहळू प्रबोधनाच्या क्षेत्रात आली. प्रबोधनानंतर लोकशिक्षणाच्या क्षेत्रात आली. नंतर ती माहिती म्हणजे बातम्यांच्या क्षेत्रात आली. त्यानंतर राजकारण आणि व्यावसायिक बातम्या यांनी हे क्षेत्र येवढे व्यापले की, एकमेकाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी पेडन्यूज ते गॉसिप न्युजच्या कोणत्याही थराला जायला वृत्तपत्रे मागे पुढे बघेनाशी झाली आहेत. वृत्तवाहिन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी वृत्तपत्रांचा नाविन्य आणण्याचा प्रयत्न असतो पण तो वाहिन्यांच्या गतिमान तंत्रज्ञनाच्या स्पर्धेत कमी पडताना दिसत आहे. जगभर मुद्रित वृत्तपत्रांचा खप कमी होताना दिसत आहे पण भारतात तो वाढताना दिसत आहे. वृत्तपत्रांचे खपाचे आकडे वाढले तरी वृत्तपत्रे वाचनाचा वेळ वाचकांनी कमी केला आहे. त्यामुळे ही परिस्थिती केंव्हाही बदलू शकते याची जाणीव भारतीय वृत्तपत्रांना झ्राली आहे. पण त्याची गती मंद आहे. दररोज घरी येणारी अर्धाकिलो रद्दीच्या वजनाची दोन तीन दैनिके वाचण्यास दहा पंधरा मिनिटे पुरतात. पेडन्यूजची दैनिके आता वाचकानंाही कळू लागली आहेत. वृत्तपत्रांच्या या घसरत्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काही जणांनी सणसणाटी पत्रकारितेचा म्हणजे टॅबलॉईड दैनिकांचा मार्ग काढला. पण तोही चालला नाही. त्यामानाने अजूनही कांही दैनिके भक्कम पाय रोवून उभी आहेत पण त्यांच्यापुढे दररोज नवी समस्या उभी रहात आहे.
    न्यूयॉर्क टाईम्सने मुद्रित आवृत्ती बंद करण्याची शक्यता व्यक्त केली असली तरी अजून त्याची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. पण त्यामुळे जगातील सर्वच दैनिकांनी नव्या समस्यावर जाहीर चर्चा करण्यास आरंभ केला. न्यूयॉकंर्  टाईम्स हे काही यूरोपमधील टॅबलाईड वृत्तपत्राप्रमाणे सनसनाटी बातम्यांच्या आधारे म्हणजे थोरामोठ्यांच्या खाजगी जीवनातील व सार्वजनिक जीवनातील गैरव्यवहार उजेडात आणून विक्री वाढविणारे वृत्तपत्र नव्हे. त्याची ही स्थिती तर टॅबलॉईड वाल्यांची स्थिती काय असेल यावर विचारच केलेला बरा. अशाच एका टॅबलाईड दैनिकाला ब्रिटनमध्ये याच आठवड्यात मंत्र्यांचे, कारखानदारांचे आणि अभिनेत्यांचे दूरध्वनी चोरून ऐकण्याच्या कारणावरून आपले प्रकाशन बंद करावे लागले. त्याचे मालक असलेले जगातील प्रसारमाध्यमांचे बादशहा म्हणविले जाणारे श्री रूपर्ट मर्डॉक यांनाही तेथील संसदीय समितीसमोर जाअून माफी मागावी लागली .
न्यूयॉकंर् टाइम्स हे काही असे सणसणाटी बातम्यांचे दैनिक नव्हे पण त्यालाही आता छापील आवृत्ती बंद करण्याचा विचार करावा लागत आहे याचे एकमेव कारण म्हणजे छापील आवृत्ती ही संकल्पनाच आता स्वरुप बदलू लागली आहे. न्यूयॉर्क टाईम्सला अमेरिकेत स्पर्धेला उतरलेले जे दैनिक आहे त्याची वाढ प्रचंड वेगाने झाली ते दैनिक म्हणजे हुपिग्टन पोस्ट या दैनिकाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याची बातम्या देण्याची पद्धतीच भिन्न आहे. एक म्हणजे ते मुद्रित दैनिक नाही. तो संगणकीय म्हणजे इंटरनेट दैनिक आहे. पण जीवनस्पर्शी आहे. पंचविशीतील दोन तरुणांनी केलेल्या या दैनिकांची वाढ बघून प्रसारमाध्यमातील महासत्ताही हादरून गेल्या आहेत.
    त्या तरुणांनी बातम्यांची शैलीच बदलली आहे. या जगातील सारी वृत्तपत्रे गेली शंभर किवा दीडशे वर्षे ‘डेडलाईन न्यूज’ ही कसोटी समोर ठेवून वाढली आहेत. म्हणजे सारी वृत्तपत्रे ही रात्री बारापर्यंत बातम्या संकलित करतात व नंतर दोन तास छापणे आणि नंतर दोन तासात वितरण असे त्यांचे गणीत असते. त्यामुळे प्रत्येक घरी सकाळी चहाच्या वेळी ताजे दैनिक मिळते. वाहिन्यांना डेडलाईनची मर्यादा नसल्याने त्यांनी त्यांच्या पद्धतीने नंतर कापले पण ज्यांना मुद्रीत पत्रकारितेप्रमाणे ‘मजकूर पत्रकारिता’करावी लागत आहे त्यांनाही नव्या आवाहनांचा सामना करावा लागत आहे.
     गेल्या काही वर्षात बहुतेक दैनिकांनी वेब आवृत्या सुरु केल्या आहेत व नेहेमीच्या डेडलाईनजर्मॅलिझम मधून मार्ग काढून वेबआवृत्याही अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. पण नव्या पत्रकारितेने जी ‘ ज्याचे त्याचे दैनिक ’ ही नवी कल्पना पुढे आणली आहे त्यामुळे यापुढच्या काळात प्रसारमाध्यमातील सर्वच व्यक्तिंना आणि संस्थांना त्याचा विचार करावा लागणार आहे. माहितीच्या प्रचंड महासागरातून त्या त्या दिवसाच्या घटनांच्या आधारे प्रत्येक व्यक्तीला लागणार्‍या बाबी देणे हे नव्या पत्रकारितेचे उद्दिष्ट दिसत आहे. कामगार, गृहिणी, करिअर करणार्‍या महिला, शेतकरी,निरनिराळ्या विषयांचे व पातळीचे विद्यार्थी, निरनिराळे व्यावसायिक , व्यापारी, निवृत्त, आजारी, लहान मुले या प्रत्येकाला त्याचे त्याचे दैनिक ठरविण्याचा व ते उपलब्ध  करण्याचा पर्याय असणार आहे. जगातील आणि भारतातील तीन चार दैनिकांतून माझे दैनिक मी तयार करू शकतो व दररोज मी माझ्या वृत्तपत्र वाचनाच्या वेळी तेवढेच उपलब्ध मी करु शकतो, असा पर्याय आता येअू लागला आहे. ते दैनिक म्हणजे फक्त वेब दैनिकही असेल किवा वेब, मोबाईल, वाहिनी व मुद्रित म्हणून एकत्र असे दैनिक असेल. वेबवरील तुम्हाला आवश्यक अशा विषयाचा पाठपुरावा मोबाईलवरील मेसेज करील संगणकावर मजकूर वाचण्याचा कंटाळा आला असेल किवा डोळ्याला ते कंफर्टेबल (आरामदायक) वाटत नसेल तर उपयोगी असा छापील मजकूर कोठे वाचावा याचा सल्लाही मोबाईलवरील मेसेज देईल.आपल्या मोबाईलवर रक्तदाब आणि साखरेचे प्रमाण बघणे शक्य झाल्याचा काळ आला आहे आणि मोबाईल कंपन्यांनी मोबाईलवर त्या भागातील वाहतूक स्थिती, हवामान स्थिती, प्रवासविषयक सर्व वेळापत्रके व उपलब्ध सीटची स्थिती, तुम्ही ज्या भागात आहात, तेथे जेवण चांगले कोठे मिळेल या पासून ते वडा पावचा चांगला ठेला कोठे आहे, याची माहिती देणे सुरु केले आहे. हे सारे तंत्रज्ञान व कंपन्या वृत्तपत्रांच्या स्पर्धेत उतरणार आहेत आणि पाश्चात्य देशात उतरल्याही आहेत.
    या दृष्टीने तीन वर्षापूवीं पुण्यात एक घटना घडली ती म्हणजे आग्नेय आशियामधील एका कंपनीने (अमेरिकेत मोठी उलाढाल असलेल्या वृत्तपत्र क्षेत्रातील चीनी उद्योगपतीने ) पुण्यातील शहरांतर्गत वाहतूक करणार्‍या पीएमपी कंपनीला वातानुकूलीत सुविधा असणार्‍या अडीच हजार बसेस विनामूल्य स्वरुपात देण्याची तयारी दर्शविली. त्यांची अट एकच होती त्या शहरातील रत्यावरील प्रत्येक जाहिरातीवर त्यांचा अधिकार असेल. प्रिंट, चॅनल, वेब, मोबाईल आणि शहरातील न्यूऑन साईन यातून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एकत्रित व स्वतंत्रपणे सहभागी होणारी मिडिया कंपनी हे करणार होती. त्याला स्थानिक माननीय नगरसेवकांनी आक्षेप घेतला व ‘ आमचे आणि आमच्या नेत्यांचे वाढदिवसाचे फ्लेक्स म्हणजे महाकाय जाहिराती जर आम्हाला लावता येणार नसतील तर  त्या एसटीच्या आकाराच्या अडीच हजार वातानुकूलीत बसगाड्या फुकट मिळाल्या तरी नकोत’ असे सांगून टाकले या मुळे विदेशी मिडियाचे आक्रमण टळले. अर्थात एकदा असे आक्रमण टळले तरी ते कायमचे टळले असे होत नाही त्यासाठी भारतीयांनीच माहितीतंत्रज्ञात अद्ययावत होण्याची गरज आहे. रॉयटर ही जगातील पहिली व सर्वात मोठी न्यूज एजन्सी या मोबाईल न्यूज स्पधेंत उतरली आहे येवढेच नव्हे तर त्यातून मिडिया विश्वातील महासत्ता होण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी जगातील प्रत्येक शेतकर्‍याला मोबाईलवर ‘त्याला त्याला आवश्यक असा शेतीसल्ला’ देण्याचा विषय सुरु केला आहे. त्यांचे सर्वात मोठे  माकर्ेट हे ‘थर्ड वर्ल्ड’ आणि त्यातूनही भारतात आहे. चीनच्या प्रत्येक शेतकर्‍याशी संवाद करण्याची युरोपीय महासत्तांची महत्वाकांक्षा त्यामुळे पुरी होत आहे.  भारतीय वातावरणातील एक वस्तुस्थिती अशी की, इंटरनेट सुरु करणे सोपे आहे पण बंद करणे महाकर्मकठीण आहे. कारण नेट सुरु करण्याच्या अनेक समस्या आहेत. पण अनेक विचारवंत त्यातूनही मार्ग काढत आहेत. सध्या येवढेच म्हणता येईल की, प्रसारमाध्यमापुढे नवी आव्हाने येत आहेत. न्यूयॉकंर् टाईम्सने एक मत व्यक्त केल्या केल्या सार्‍या जगात त्याच्या तरल लहरी उठू लागल्या आहेत.
    माहिती तंत्रज्ञानातील ही घोडदौड पाहिली की वाटू लागते की आपण या कोणत्या गाडीत बसलो आहोत, हे माहीत नाही ही या तंत्रज्ञानाच्या मदतीने ही गाडी कोठे जाणार आहे हेही माहीत नाही पण समस्या कोणतीही असली तरी बाळशास्त्री जांभेकर यांनी लावलेल राष्ट*वादाच्या बांधणीसाठी आवश्यक असलेले हे सर्वशक्तीनिशी जगवावे तर लागलेच आणि जगाच्या स्पर्धेत ते जोमाने वाढवावेही लागेल.
¬- मोरेश्वर जोशी, पुणे

1 thought on “…यापुढे प्रसारमाध्यमे म्हणजे वाहिनी,नेट,मोबाईल आणि न्यूयॉन साईनही”

Leave a Comment